चितोड्याच्या ग्रामसभेला अनेक सदस्यांनी फिरविली पाठ

ऑगस्ट 20, 2025 9:07 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील चितोडा येथे ऑगस्ट महिन्यात घेतली जाणारी ग्रामसभा दि १९ रोजी पार पडली. मात्र अनेक सदस्यांनी या ग्रामसभेला पाठ फिरविल्याचे दिसून आले. अवघ्या सरपंचासह ग्रामसेवक आणि २ सदस्यांच्या उपस्थित ही ग्रामसभा पार पडली. या सभेला काही गावकरीही उपस्थित होते. या सभेत गावाच्या हितासाठी काही निर्णय मांडली गेली.

chitoda

ग्रामसभेत कोणते निर्णय घेण्यात आले ?

१९ रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत गावाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काही निर्णय मांडण्यात आले. त्यात डिजीटलायझेशन ग्राम पंचायत करणे, नरेगामध्ये वृक्ष लागवड अंतर्गत बांबू लागवड, जलतारा, शोष खड्डे करणे तसेच या बैठकीत शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय घेण्यात आला आहे. २ हेक्टरच्या आत शेतकऱ्यांना केळी लागवडसाठी सबसिडीचा लाभ मिळणेबाबत निर्णय मांडण्यात आला.

Advertisements

तसेच जनसुविधांसाठी लेडिज टॅायलेट, जेन्स टॅायलेट, शेत रस्ते मोकळे करण्याबाबत जे रस्ते स्थगित आहे त्यांना चालू करणे, ग्रामपंचायत अॅप Alerto sos वापरात आणणे, गाव सुरक्षा व्यक्तीगत सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन करण्यासह गावातील इतर विकासकामांवर चर्चा झाली आणि आवश्यक निर्णय मांडण्यात आले.

Advertisements

यांची होती उपस्थिती?

या ग्रामसभेला सरपंच अरुण पाटील, ग्रामसेवक, सदस्य प्रदीप धांडे, सदस्या उज्वला संदीप पाटील, ग्रामरोजगार सहाय्यक गोपाळ भारुडे, डिगंबर बोंडे, सोनू भागवत पाटील, गोकुळ पाटील, राजेंद्र पाटील, अशोक भंगाळे, रामदास पाटील, रवींद्र पाटील, मुरलीधर हिरामण पाटील, एकनाथ मुकुंदा पाटील, पुंडलिक पाटील, विश्वनाथ सुपडू पवारसह काही गावकरी उपस्थित होते.

ग्रामसभेला अनेक सदस्यांची पाठ

या ग्रामसभेला अनेक सदस्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. यापूर्वी झालेल्या ग्रामसभेला अनेक सदस्य दांडी मारताना दिसून आले असून ही अत्यंत गंभीर बाब आहे. जिथे सदस्यांचीच उपस्थितीबाबत उदासीनता आहे, तिथे गावाचा विकास कसा होणार? असा प्रश्न गावकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. सध्या सरपंचासह मोजक्याच दोन तीन सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा पार पडताना दिसत आहे. सध्या नियमानुसार केल्या जाणाऱ्या कामात खोडा घालून काही सदस्यांकडून सरपंचाचा विरोध केला जात असून त्यातून अनेक सदस्य ग्रामसभेला पाठ फिरवीत असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान ग्रामसभेला मोजकेच गावकरी उपस्थित असलयाने ग्रामस्थांची उपस्थिती देखील वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व जागृती होणे गरजेचे आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now