⁠ 
रविवार, एप्रिल 28, 2024

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात बालकांच्या हृदयावर २० ऑगस्ट रोजी बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया शिबिर

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२३ । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयातील हृदयालयात दर महिन्याला बालकांच्या हृदयावर बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया शिबिरं आयोजित केले जात असून या महिन्यातही रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी शिबिर आयोजित केले आहे.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मार्थ रुग्णालयाच्या हृदयालयात डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.सुमित शेजोळ यांच्याद्वारे बालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच मुंबई येथील वाडिया हॉस्पिटल येथील डॉ.श्रीपाल जैन यांच्याद्वारे बालकांच्या हृदयावर बिनाटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. त्याकरीता शुक्रवार दि.१८ ऑगस्ट पासून मोफत स्क्रिनिंग सुविधा हृदयालयात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात बालकांच्या हृदयाची सोनोग्राफी विनामूल्य केली जाणार आहे. तसेच ज्या बालकांना जन्म: हृदयालयाला छिद्र असेल, व्हॉल्वची समस्या असेल अशा बालकांवर एएसडी/व्हीएसडी शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कल्याण योजनेंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे. आतापर्यंत शेकडो बालकांना शस्त्रक्रियेने दिलासा मिळाला आहे. सोबत येतांना आधार कार्ड व रेशन कार्ड घेऊन यावे असे आवाहन हृदयालयातर्फे करण्यात आले. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी रत्नशेखर जैन ८००७७०५१३७ यांच्याशी संपर्क साधावा.