हृदयद्रावक ! वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने ४ वर्षीय बालक ठार, एरंडोल तालुक्यातील घटना

जुलै 5, 2025 10:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एरंडोल येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चाक अंगावरून गेल्याने चार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना हृदयद्रावक घटना पिंपळकोठा खुर्द (ता. एरंडोल) येथे घडली. शुभम योनाक्ष मासाळ असं बालकाचे नाव असून याबाबत वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

shubham mhasal

एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा खुर्द येथील माजी सरपंच नारायण मासाळ यांचे नात आरुष (वय ६ वर्षे) व शुभम हे दोघे पाळधी येथील जीपीएस शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांना शाळेत जाण्यासाठी (क्र. एम.एच. १९ इ.ए. ६८५६) हे वाहन लावले होते. शुक्रवारी सकाळी आरुष व शुभम हे या वाहनातून शाळेत गेले. शाळा सुटल्यानंतर ते दोन्ही वाहनातून खाली उतरल्यानंतर गाडी वेगाने पुढे निघाली. शुभम यास वाहनाचा धक्का लागला आणि तो खाली पडला. त्याचवेळी त्याच्या अंगावरून गाडीचे चाक गेले.

Advertisements

रात्री उशिरा शुभमचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास शुभमवर पिंपळकोठा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान शुभमचा मृतदेह घेऊन वाहन गावात पोहचले असता शुभमचे आईवडील व कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीयांचा विशेषतः शुभमच्या मातेचा आक्रोश पाहून उपस्थितांना अश्रू अनावर झाले. या प्रकरणी वाहनचालक मनोज मुक्तारसिंग पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now