मातेने दीड वर्षांच्या चिमुकल्याचे मृत्यूचे सांगितले असे कारण.. ऐकून पोलिसही चक्रावले
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२३ । मध्य प्रदेशच्या देवासमध्ये दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मृत चिमुकल्याच्या आईने मृत्यूचे कारण पोलिसांना सांगितले आहे. चहा प्यायल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या आई केला आहे. मात्र आईच्या या दाव्याने पोलीसही चक्रावले आहे.
चहा हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे, तो फायदेशीर आहे की हानीकारक, यावर बऱ्याच काळापासून चर्चा होत आहे. पण चहा पिणेही घातक ठरू शकते का? आता हा प्रश्न या बातमीने उपस्थित केला आहे.
सिमरोल पोलिसांनी सांगितलं की, लहान मुलाचे वडील तुरुंगात असल्याने तो आपल्या आजोबांच्या घरी होता. मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, चहा दिल्यानंतरच मुलाला अस्वस्थ वाटू लागले.प्रकृती बिघडल्याने त्यांनी त्याला इंदूरच्या चाचा नेहरू रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच मुलाचा मृत्यू झाला. डॉक्टरांना दिलेल्या माहितीनुसार, मुलाला हॉस्पिटलमध्ये आणले तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
एवढ्या लहान मुलाला चहा दिलाच का? असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. या बालकाचा मृत्यू खरंच चहा प्यायल्याने झालाय की दुसरं काही कारण आहे? या प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.