जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२२ । राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधान मंडळात उद्या बोलाविण्यात आलेल्या अधिवेशनात बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. सध्याचे पक्षीय बलाबल लक्षात घेता भाजपचे पारडे जड आहे. दरम्यान, सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे सांगत राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. (Chief Minister Uddhav Thackeray resigned)
राज्यात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या घडामोडीनंतर आज दुपारी राज्यातील मविआ सरकार कोसळण्याची स्थिती निर्माण झाली होती. राज्यावर गेल्या आठ दिवसांपासून राजकीय अस्थिरतेचे ढग जमले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर ठाकरे सरकारने न्यायालयात धाव घेतली होती. उद्या दि.३० जून रोजी विशेष अधिवेशनात बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाच्या निर्णयाने मविआ सरकारला मोठा धक्का बसला.
मुंबईत शिवसैनिकांचा रक्त सांडू नका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना उद्या जे बंडखोर आमदार मुंबईत येणार आहेत या आमदारांच्या सिक्युरिटीसाठी केंद्र शासनाने मुंबईमध्ये मोठा बंदोबस्त केला आहे मिलिटरी ,प्यारा – मिलिटरीचे जवान मुंबई तैनात केले गेले आहेत अशा वेळी शिवसैनिकांना संयम राखा मुंबईमध्ये तुमचं रक्त सांडू देऊ नका असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केला आहे.
शिवसेना भवनात ठाण मांडून बसणार
बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आज जरी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असलो तरी येत्या काळात मी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवसेना भवन मध्ये बसणार आहे. यावेळी मी नवीन उमेदीची शिवसेना पुन्हा एकदा तयार करणार आहे.
त्यांना आता मी आपलं मानत नाही
काही शिवसैनिकांना या आधी मी आपलं मन होतो. मात्र त्यांना आता मी आपला मानत नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा केलं ते आता त्याच्या मुलालाच मुख्यमंत्री पदावरून काढायला निघाले आहेत हे पुण्य त्यांना मिळत आहे. आणि मी अशा लोकांवर विश्वास ठेवला आहे माझं मी पाप समजतो. असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्रिपद जाण्याचे दुःख नाही
मी मुख्यमंत्री झालो तो देखील स्वतःच्या मर्जीने नाही. त्या वेळेच्या परिस्थितीने मला मुख्यमंत्री केलं होतं. यामुळे आता मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना देखील मला बिलकुल दुःख होत नाहीये. असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.