⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | भडगाव | पत्रकार मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया ; म्हणाले..

पत्रकार मारहाण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया ; म्हणाले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑगस्ट २०२३ । काही दिवसांपूर्वीच आमदार किशोरआप्पा पाटील (Kishor Patil) यांनी शिवीगाळ करून धमकावण्यात आलेले पत्रकार संदीप महाजन (Sandip Mahajan) यांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर या प्रकरणावर राज्यातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘पत्रकारावर कोणत्याही परिस्थितीत हल्ला होता कामा नये. दोषींवर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तत्पूर्वी पत्रकार हल्ला प्रकरणावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, ‘पत्रकाराला फोनवर आई- बहिणीवरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ? तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून…’.असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, मारहाण प्रकरणी संदीप महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.