मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी दुपारी केल. मात्र या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून एकनाथ शिंदेच आमचे नेते आहेत. असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
अडीच वर्ष सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकरला एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पायउतार व्हावं लागलं. आता महाराष्ट्रात राज्यात शिंदे गट आणि भाजपचे नवीन सरकार स्थापन झालं आहे. या नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून भाजपमधील खदखद समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
“केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता.असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून एकनाथ शिंदेच हे आमचे नेते आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा कोणीही चुकीचा अर्थ लावू नये.