जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा..
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । ‘शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जळगावात आले आहे. जळगाव शहरातील पोलीस कवायत मैदानावर हा कार्यक्रम पार पडत असून या कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात केळी विकास महामंडळासाठी १०० कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली. तसेच जळगाव शहर संपूर्ण काँक्रीटीकरण करून खड्डेमुक्त करण्याची आणि विभागीय पोलीस आयुक्त कार्यालय हे जळगाव येथे होण्याचा निर्णय शासन लवकरच घेणार असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहे.
याप्रसंगी त्यांनी विरोधकांवर टिका करतांना राज्य व केंद्र सरकारने जनहिताची कामे केल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी शास्नानाने जळगावच्या विकासाकरिता विविध योजनांसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला असून जिल्ह्यासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले कि, शासन आपल्या दारी उपक्रमांमधून हजारो लोक एकाच छताखाली येत आहे. शासन आपल्या दारी येत असून सरपंचांना उद्देशून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाव आपल्याला समृद्ध करायचे आहे. आपल्याला अनेक योजना सुरु करायचे आहे . सर्वसामान्यांचे हे सरकार असून या ठिकाणी ११ महिन्यापूर्वी छातीठोकपणे सांगत असून तेव्हा आम्ही मी आणि फडणवीस दोघेच मंत्री म्हणून निर्णय घेत होतो. कॅबिनेटच्या विस्तार झाल्यावर सर्वसामान्य व्यक्तींना आम्ही मंत्री पदे दिली.
शासन आपल्यादारी हि दुर्गम भागात उत्तमपणे पोहचत आहे. लोकाभिमुख कार्यक्रम यासारखा दुसरा होऊ शकत नाही २ लाख ५३ हजार लाभार्थ्याना याचा लाभ मिळत आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे अनेकांची धास्ती वाटून त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे. केंद्र सरकारचा राज्य सरकारला पूर्ण अपाठिंबा आहे. एकही निधी परत जात नाही.
आज आपण मोठे निर्णय घेऊ शकतो याचे श्रेय हे मोदी सरकारचे आहे. हि बाब अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. दीड लाख रुपयांची योजना ५ लाखांपर्यंत केली आहे. असे हे सरकार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना या नागरिकांच्या आरोग्यासाठी आहे. केळी विकास महामंडळसाठी १०० कोटींच्या निधीची घोषणा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
३२ सिंचन योजनांना मंजुरी दिली आहे. विभागीय पोलीस आयुक्त कार्यालय हे जळगाव येथे होण्याचा निर्णय शासन लवकरच घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. जळगावचे रस्ते काँक्रीटचे करून खड्डे मुक्त जळगाव करणार असल्याची गवाही त्यांनी यावेळी दिलीया राज्यात जेवढ्या पायाभूत सुविधा देशात फक्त आपल्या राज्यात होत आहे. वेगवान निर्णय घेणारे गतिमान सरकार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या सरकामध्ये परदेशी गुंतवणुकीत मागे गेले होते. ते आज ११ महिन्याच्या कार्यकाळात पुन्हा क्रमांक एकवर आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात उद्योगपती येताहेत, रोजगार निर्मिती होत आहे, मनुष्यबळ सक्षम आहे असे सांगितले. जळगावचे सोने शुद्ध असल्याचे भाऊंनी मला सांगितले होते. त्याचा भाव कमी जास्त होत असतो. मात्र इथल्या सारखी सोन्याची माणसे मिळणार नाही. खान्देशची ठेचा भाकर प्रसिद्ध आहे. मात्र गुलाबभाऊ ठेचा असून गिरीश भाऊंनी समजून घ्यावे असे सांगताच सभागृहात हंशा पिकला.