---Advertisement---
महाराष्ट्र बातम्या सरकारी योजना

बहिणीनंतर आता मुख्यमंत्र्यांची लाडक्या भावांसाठी खास योजनेची घोषणा; दरमहा मिळणार ‘इतके’ रुपये?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२४ । राज्य सरकारने नुकतेच राज्यातील महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ ही योजना सुरु केली असून या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठीहीखास योजनेची घोषणा केली आहे.

New Yojna jpg webp

काय आहे घोषणा?
जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. या महापूजेनंतर त्यांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी ही घोषणा केली.

---Advertisement---

सरकार पैसे भरणार
हा तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल. त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. एक प्रकारे आपण स्कील्ड मॅनपावर (कुशल कामगार) तयार करत आहोत. राज्यसह देशातील उद्योग जगताला कुशल तरुण पुरवणार आहोत. आपले तरुण त्यांच्या कामात कुशल व्हावेत, यासाठी सरकार पैसे भरणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---