---Advertisement---
भुसावळ

भुसावळात एमआयडीसीतील केमिकल फॅक्टरी भीषण आग, फॅक्टरी जळून खाक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२१ । भुसावळ शहरातील एमआयडीसी परीसरात असलेल्या केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागल्याची घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडलीय. या आगीत संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली. दरम्यान, या आगीमागचे कारण अद्यापही कळू शकले नाहीय.

bhusawal midc factory fire

आगीचे स्पष्ट कारण अद्याप कळू शकलेले नाही. मंगळवारी सकाळी कंपनीतून आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागलाच सुज्ञ नागरीकांनी पालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळवल्यानंतर दीपनगर व भुसावळ पालिकेच्या बंबाने घटनास्थळी धाव घेतली.

---Advertisement---

समजलेल्या माहितीनुसार, रेल नीर प्रकल्पाजवळील एफ- 21 येथे केमिकल बनवणारी फॅक्टरी असून ती जळगावातील व्यापारी मयूर भोळे यांची असल्याचे समजते. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.

हे देखील वाचा :

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---