⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | आला रे आला!! सर्वात स्वस्त लॅपटॉप लाँच, फोनच्या किमतीत आणा घरी..

आला रे आला!! सर्वात स्वस्त लॅपटॉप लाँच, फोनच्या किमतीत आणा घरी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२३ । जर तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा असेल पण जास्त किंमतीमुळे तो खरेदी करू शकत नसाल तर काळजी नको.. कारण आता तुम्ही बजेट स्मार्टफोनच्या किमतीतही लॅपटॉप खरेदी करू शकणार आहात. होय. शार्क टँक शोमध्ये भारतातील सर्वात स्वस्त लॅपटॉप दाखवण्यात आला होता आणि आता हा लॅपटॉपही अत्यंत कमी किमतीत ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे.

प्राइमबुक लॅपटॉप लाँच होताच Jio चा लॅपटॉप JioBook चे टेन्शन वाढवले ​​आहे. प्राइमबुकची किंमत किती आहे आणि हा लॅपटॉप JioBook पेक्षा किती स्वस्त आहे? ते जाणून घेऊया..

वैशिष्ट्ये जाणून घ्या
या लॅपटॉपमध्ये 11.6 इंच HD IPS डिस्प्ले आहे जो 720 पिक्सेल रिझोल्यूशन ऑफर करतो. वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या परवडणाऱ्या लॅपटॉपमध्ये मीडियाटेक ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे.

Android 11 (Prime OS) वर काम करणारा हा लॅपटॉप ग्राफिक्ससाठी 4 GB LPDDR4 RAM आणि ARM Mali G72 MP3 वापरतो. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर लॅपटॉपच्या पुढील बाजूस 2 मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आहे जो 30fps (फ्रेम प्रति सेकंद) वर काम करतो.

कनेक्टिव्हिटीसाठी, लॅपटॉपमध्ये मिनी एचडीएमआय, ड्युअल-बँड वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ आवृत्ती 5 सपोर्ट असेल. प्राइमबुकमध्ये उत्तम ऑडिओ अनुभवासाठी वर्धित स्पीकर, जलद चार्जिंगसाठी USB टाइप-सी पोर्ट आणि 128 GB पर्यंत स्टोरेज पर्याय असेल.

किंमत किती आहे?
या परवडणाऱ्या लॅपटॉपचा बजेट फ्रेंडली वाय-फाय व्हेरिएंट 12,990 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. यासोबतच सध्याच्या प्राइमबुक 4G लॅपटॉपची अपग्रेडेड व्हर्जन देखील लॉन्च करण्यात आली आहे, ज्याची किंमत 14,990 रुपये आहे. फ्लिपकार्टवर तुम्हाला हा लॅपटॉप या किमतीत मिळेल.

दुसरीकडे, Jio ब्रँडच्या सर्वात स्वस्त JioBook लॅपटॉपची किंमत 16,499 रुपये आहे. तुम्ही हा लॅपटॉप फ्लिपकार्टवरून नाही तर ई-कॉमर्स साइट Amazon आणि Jio च्या अधिकृत साइटवरून खरेदी करू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.