वाणिज्य

‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 7-सीटर कार ; घ्या जाणून त्यांच्या किंमती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२२ । मोठ्या कुटुंबांना अशा वाहनांची आवश्यकता असते, ज्यांची आसनक्षमता जास्त असते. सहसा 5 सीटर वाहने जास्त विकली जातात. परंतु जर तुम्हाला तुमच्या मोठ्या कुटुंबाला फक्त एकाच कारमध्ये प्रवास करायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी 7-सीटर कार खरेदी करावी लागेल. परंतु, बहुतेक 7-सीटर कार 5-सीटर कारपेक्षा महाग असते. मात्र, अशा परिस्थितीत तुम्हाला स्वस्त 7 सीटर कार घ्यायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा वाहनांची माहिती देणार आहोत.

डॅटसन गो+
Datsun GO+ च्या किंमती रु. 4.26 लाखांपासून सुरू होते आणि मॉडेलवर अवलंबून रु. 7 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जातात. हे 7 प्रकारांमध्ये येते. ही 7 सीटर कार आहे. यात 1198 cc चे पेट्रोल इंजिन आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (CVT) ट्रान्समिशन पर्याय आहेत. जर आपण मायलेजबद्दल बोललो तर ते 18.57 ते 19.02 kmpl मायलेज देऊ शकते.

रेनॉल्ट ट्रायबर
Renault Triber ची किंमत रु. 5.88 लाख पासून सुरू होते आणि मॉडेलवर अवलंबून रु. 8.44 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जाते. Renault Triber एकूण 10 प्रकारांमध्ये येते. ही देखील 7 सीटर कार आहे आणि पेट्रोल इंजिनसह येते. यात 999 cc इंजिन आहे, जे 18.29 ते 19 kmpl मायलेज देते. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक (AMT) ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत.

मारुती सुझुकी Eeco
Maruti Suzuki Eeco ची सुरुवातीची किंमत 4.63 लाख रुपयांपासून सुरू होते आणि मॉडेलनुसार ती 7.63 लाख रुपयांपर्यंत जाते. हे एकूण 5 प्रकारांमध्ये येते. यात 5 सीटर आणि 7 सीटर असे दोन्ही पर्याय आहेत. यात 1196 cc पेट्रोल इंजिन आहे. त्याची CNG आवृत्ती पण येते. यामध्ये फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन उपलब्ध आहे. हे 16.11 ते 20.88 पर्यंत मायलेज देऊ शकते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button