जळगाव लाईव्ह न्यूज । भुसावळामार्गे पुण्याला रेल्वेनं परावास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे पुणे विभागातील हडपसर रेल्वे स्थानकावर सध्या टर्मिनलच्या विकासासाठी रेल्वेने नॉन इंटर लॉकिंग कामे हाती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे विभागाने विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला. परिणामी भुसावळ विभागातून जाणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल झाला. त्यात अमरावती – पुणे एक्स्प्रेस ही गाडी रविवारी फक्त दौंडपर्यंत धावेल.

हडपसर येथील ब्लॉकमध्ये शनिवारपासून कामे सुरू होतील. त्याचा फटका भुसावळकडून पुण्याकडे जाणाऱ्या व पुण्याकडून भुसावळकडे येणाऱ्या रेल्वे गाड्यांना बसेल. तीन गाड्या नियोजित वेळेपेक्षा विलंबाने धावतील. यात १२२२१ पुणे – हावडा दुरांतो एक्सप्रेस १९ जुलैला पुणे स्थानकावरून नियोजित वेळेपेक्षा ९० मिनिटे उशिराने सुटेल. ११४०६ अमरावती – पुणे एक्स्प्रेस १९ जुलैला अमरावती स्थानकावरून नियोजित वेळेपेक्षा १ तास उशिराने सुटेल. २२१७१ पुणे – राणी कमलापती हमसफर एक्स्प्रेस २० जुलैला पुणे येथून १ तास ४५ मिनिटे उशिराने सुटेल. या बदलानुसारच प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करावे.

एक गाडी शॉर्टटर्मिनेट
पुणे येथील ब्लॉकचा फटका ११०२५ पुणे – अमरावती एक्स्प्रेसला बसला ही गाडी २० जुलैला पुणेऐक्जी दौंड स्थानकावरून दुपारी १२.१५ वाजता सुटेल. ही गाडी पुणे ते दौंड दरम्यान धावणार नाही.







