जळगाव जिल्हा

भुसावळातून मुंबईला जाणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांच्या संरचनेत व वेळेत बदल; आताच जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२४ । भुसावळ, जळगावातून मुंबईला जाणाऱ्या काही गाड्यांच्या संरचनेत व वेळेतही बदल करण्यात आला आहे. तसेच भुसावळ-दादर एक्स्प्रेस ( ०९०५२) मुंबई सेंट्रल ऐवजी दादर स्थानकावर सकाळी ५.१५ वाजता पोहोचेल. या गाड्यांना ३ जुलै ते २७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

गाडी क्रमांक १९००३ वांद्रे टर्मिनस-भुसावळ खान्देश एक्सप्रेसचे टर्मिनस वांद्रे टर्मिनसऐवजी दादरला बदलण्यात आले आहे. ही गाडी सध्या दर मंगळवार, गुरुवार, रविवारी रात्री १२.५ वाजता वांद्रे टर्मिनसवरून सुटते ती ४ जुलैपासून दर मंगळवार, गुरुवार, रविवारी दादरहून रात्री १२.५ वाजता सुटेल. मध्यवर्ती
स्थानकांवर या गाडीच्या

थांबण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १९००४ भुसावळ-दादर खान्देश एक्स्प्रेस ४ जुलैपासून वांद्रे टर्मिनसऐवजी दादर स्थानकावर सकाळी ५.१५ वाजता पोहोचेल. या गाडीचा नवसारी आणि बोरिवली स्थानकांदरम्यानच्या आगमन व निर्गमनाच्या वेळा सुधारण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे गाडी क्रमांक ०९०५१/०९०५२ मुंबई सेंट्रल-भुसावळचे टर्मिनस मुंबई सेंट्रलऐवजी दादरला हलवण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०९०५१ दादर-भुसावळ एक्सप्रेस आता दादरहून मुंबई सेंट्रलऐवजी दर सोमवार, बुधवार, शनिवारी रात्री १२.५ वाजता सुटेल. या बदलाने सेंट्रल आणि वांद्रेला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button