जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मे २०२४ । संगणक टंकलेखन परीक्षेत बोगस उमेदवारांसह गैखकारांना पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जून २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षा प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रश्नांचा क्रम बदलण्यासह ई-मेलच्या प्रश्नाच्या वेळेत कपात केली असून, त्यासाठी ८ ऐवजी ५ मिनिटे दिली जाणार आहेत. स्पीड पॅसेज वेगात सोडवण्याचा सराव होण्यासाठी ३ मिनिटांचा सराव उतारा (ट्रायल पॅसेज) देण्यात येणार आहे.
इंग्रजी, मराठी आणि हिंदी ३० व ४० शब्दाति मिनिटाच्या संगणक टंकलेखन परीक्षेमध्ये सबर्वांत प्रथम पाच मिनिटांचा ई-मेल व त्यानंतर लगेचच ७ मिनिटांचा स्पीड पैसेजचा प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी देण्यात येणार आहे. त्यानंतर स्टेटमेंट, लेटर, ऑब्जेक्टिव्ह अशा क्रमाने प्रश्न सोडवता येणार आहेत. ट्रायल पैसेजला गुण मिळणार नसले तरी, तो सोडवणे विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील.
संगणक टंकलेखन परीक्षा चार सत्रात होणार असून, पहिले सत्र सकाळी ९, दुसरे सत्र सकाळी १९, तिसरे सत्र दुपारी १.१५ वाजता आणि चौथे सत्र दुपारी ३.१५ वाजता सुरू होईल, लॉगिन केल्यानंतर ५ मिनिट ई-मेलचा प्रश्न सोडवण्यासाठी देण्यात येणार आहे. हा प्रश्न ऑटो सबमिट होणार आहे. त्यानंतर ३० सेकंदांचा टाइम अलर्ट (काउंटडाउन) देऊन ७ मिनिटांच्या स्पीड पॅसेजला विद्यार्थ्यांना सुरुवात करता येईल.