विशेष ब्लॉकमुळे रेल्वे थांब्यांमध्ये बदल ; भुसावळामार्गे धावणाऱ्या या गाड्यांचा समावेश
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२४ । मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्र. १० व ११ चा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या थांब्यांमध्ये बदल करण्यात येणार आहे.
हा ब्लॉक गुरुवार रात्रीपासून ते ३० व ३१ रोजी अर्थात गुरुवार व शुक्रवारी रात्री घेण्यात येणार आहे.
या ब्लॉकमुळे खालील दिलेल्या तपशिलानुसार काही गाड्या दादर स्थानकावर थांबविण्यात येणार आहेत. यात, क्र. १२५३३ लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्स्प्रेस, क्र. ११०५८ अमृतसर मुंबई एक्स्प्रेस, क्र.११०२० भुवनेश्वर मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, क्र. १२८१० हावडा-मुंबई मेल या गाड्या २९ मेपर्यंत दादर स्थानकावर थांबतील.
क्र. १२११२ अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस २७ ते ३० मे या दरम्यान ठाणे स्थानकावर थांबेल. तर काही गाड्या दादर स्थानकातून प्रस्थान करतील. त्यात क्र. २२१५७ मुंबई चेन्नई सुपरफास्ट मेल, क्र. ११०५७ मुंबई – अमृतसर एक्स्प्रेस (३० मेपर्यंत), तर क्र. २२१७७ मुंबई वाराणसी महानगरी एक्स्प्रेस (३१ मेपर्यंत) दादर स्थानकातून निघेल