⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल ; स्टेशनवर जाण्याआधी जाणून घ्या..

भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल ; स्टेशनवर जाण्याआधी जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हीही या गाड्यांनी प्रवास करणार असाल तर आधी गाड्यांचा बदल पाहून स्टेशनवर जावे.

गोरखपूर- भटनी सेक्शन दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे दि. ११ सप्टेंबरपर्यंत काही रेल्वे गाड्या गोरखपूरपर्यंत जाणार नाही. काही रेल्वे या भटनीत तर काही रेल्वे महूतच थांबतील आणि तेथूनच सुटतील. गोरखपूर-भटनी सेक्शन दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम घेण्यात आले आहे. यासाठी गाडी क्र. १२१६५ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर ही ८ रोजी भटणी स्टेशन येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येत आहे. भटनी ते गोरपूर दरम्यानची गाडी रद्द असले.

गाडी क्रमांक १२१६६ गोरखपूर -लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस ही ८व९ रोजी भटनी स्टेशन येथून सुटेल. गोरखपूर-भटनी दरम्यान गाडी रद्द राहील. गाडी क्र. ११०३८ गोरखपूर-पुणे ही ९ रोजी महू येथून सुटेल. गोरखपूर ते मऊ दरम्यान गाडी रद्द राहील. गाडी क्र. ०१०२८ गोरखपूर -दादर दरम्यान विशेष गाडी ९ व ११ रोजी महू स्टेशन येथून सुटेल. गोरखपूर ते महू दरम्यान गाडी रद्द राहील. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.