⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | जळगाव जिल्हा | महत्वाची बातमी ! भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल..

महत्वाची बातमी ! भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । भुसावळ विभागातून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळेत १ जूनपासून बदल केला आहे. यामुळे नेमक्या कोणत्या गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे? हे प्रवाशांना माहिती असणे गरजेचे आहे.

या गाड्यांच्या वेळेत बदल?
अमरावती – पुणे हुतात्मा एक्सप्रेस, सीतापूर – एलटीटी, जबलपूर – मुंबई गरीबरथ, पुणे – अजनी हमसफर एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

११०२५ पुणे – अमरावती हुतात्मा एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर रात्री ८.३० वाजता येऊन ८.३५ वाजता सुटणार आहे. ही गाडी पूर्वी ८.४० वाजता येत होती. ११०२६ अमरावती ते पुणे हुतात्मा एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर पहाटे (मध्यरात्री) २.२० वाजता येऊन २.२५ वाजता सुटेल. पूर्वी ही गाडी २.३५ वाजता येऊन २.४० वाजता सुटत होती. ही गाडी जळगाव स्थानकावर पहाटे २.५० वाजता येऊन दोन मिनिटांत सुटेल. ही गाडी पाचोरा स्थानकावर ३.२३, कजगाव ३.४४, चाळीसगाव ३.५८ वाजता येईल. प्रत्येक स्थानकांवर दोन मिनिटांचा थांबा असेल.

इतर गाड्यांचा बदल
१२१०७ सीतापूर – एलटीटी एक्सप्रेस नाशिक स्थानकावर सायंकाळी ५.४७ येऊन ५५० वाजता सुटेल. २२१२३ पुणे – अजनी हमसफर एक्सप्रेस नांदुरा स्टेशनवर रात्री ११.४४, अकोला स्थानकावर रात्री १२.४५ वाजता येऊन दोन मिनिटांनी सुटेल. जबलपूर – मुंबई गरीबरथ एक्स्प्रेस नाशिकरोड स्थानकावर सकाळी ७.४२ येईल, हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस नाशिक रोडला पहाटे २.१५ येऊन २.१८ वाजता सुटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.