जीवघेणा महामार्ग उभारणी केल्या बद्दल चंद्रकांत सिन्हा यांचा सत्कार
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । युवासेना तर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगावचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांचा खान्देश अद्भुत अभियंता पुरस्कारने सन्मान करण्यात आला. जीवघेणा महामार्ग उभारणी केल्या बद्दल युवासेनेने सिन्हा यांचा सन्मान केला.
स्मृती चिन्ह देऊन चंद्रकांत सिन्हा यांचा सन्मान करतांना युवासेना सहसचिव विराज कावडीया, महानगर युवाधिकारी स्वप्नील परदेशी, विशाल वाणी, अमित जगताप, शंतनू नारखेडे, प्रीतम शिंदे, हूझेफा बागवान, गौरव राजपूत, राज पाटील, शंतनू नारखेडे आदी उपस्थित होते.
महामार्गावर उभारलेले उद्यान त्वरित बंद करून, पथदिवे लावावे, तांत्रिक झालेल्या चुका त्वरित सुधारण्यात याव्या या विषयाची मागणी युवासेने तर्फे करण्यात आली. दोन दिवसात उद्यान बंद करण्यात येतील या सह सर्व उपाय योजना करण्यात येतील असे ग्वाही चंद्रकांत सिन्हा यांनी दिली. केंद्रीय सडक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या अधिकारीवर्गाचा सत्कार व्हावा या साठी युवासेना तर्फे कार्यक्रम प्रस्तावित करण्यात आला आहे.