⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | हवामान | उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता ; IMD कडून अलर्ट जारी

उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता ; IMD कडून अलर्ट जारी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । सप्टेंबर महिन्यात सुरुवातीचे दोन आठवडे राज्यभर जोरदार पाऊस कोसळल्यानंतर मान्सूनने राज्यात उघडीप घेतली आहे. पण विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे.

रविवारी हवामान खात्यानं नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारी उर्वरित राज्यात मात्र कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यात पावसाचा किंचितचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

सोमवारी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहेत. तर मंगळवारी पालघर, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसात राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

परतीचा पाऊस लांबणार

यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीपातील पिकं काढणीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. परतीच्या पावसामुळे दरवर्षी पिके पाण्यात जाण्याचा धोका असतो. पण यंदा परतीचा पाऊस लांबणार असल्याने पिकांची काढणी करता येणार आहे. यंदा 15 दिवस उशीरा राज्यस्थानमधून परतीचा पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही परतीचा पाऊस उशीरा दाखल होण्याची शक्यता आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.