जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२३ । चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विरोधकांना धुळ चारत १८ पैकी १५ जागावर आघाडी मिळवून आपले वर्चस्व दाखविले आहे.या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांना हा धक्का मानला जात आहे.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान आलं. या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. यात १८ जागापैकी तब्बल १५ जागावर भारतीय जनता पक्ष प्रणित युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. केवळ तीन जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार मंगेश चव्हाण जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत. बाजार समितीतील या यशामुळे त्यांचे सहकार क्षेत्राततही वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे.
बाजार समितीसाठी अद्यापही मतमोजणी सुरू असून आतापर्यंत १० जागांचा निकाल जाहीर झाला त्यातील ८ जागा भाजपला तर दोन जागा महाविकास आघाडीला मिळाल्याचे सांगितले जात आहे. इतर जागांची मतमोजणी अद्याप सुरू असून लवकरच निकाल अपेक्षीत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनल उभे करण्यात आले होते. त्यांना केवळ दोन -तीन जागावर आघाडी असल्यामुळे त्यांना धक्का मानला जात आहे.