---Advertisement---
गुन्हे चाळीसगाव

चाळीसगावच्या तरुणीला बळजबरीने औरंगाबादला नेले, अन्… पुढे जे घडलं ते धक्कादायकच

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२३ । महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होत नाहीय. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येतेय. अशातच आता चाळीसगाव तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तरुणीसोबत असलेल्या प्रेम संबंधातून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आणि चाकूचा धाक दाखवत तरुणाने २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत तिघांविरुद्ध मेहूणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

crime 24 jpg webp

नेमकी काय आहे घटना?
चाळीसगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २१ वर्षे तरुणी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील निधोरा येथील किरण भाऊसाहेब कोलते याचे प्रेम संबंध होते. १३ जानेवारी रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास किरण हा त्याच्या तीन मित्रांसोबत तरुणी राहत असलेल्या परिसरात आला. यादरम्यान किरण याने तरुणीला बोलावून तिच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच चाकूचा धाक दाखवत, तरुणीला मित्रांच्या मदतीने बळजबरीने कारने औरंगाबाद येथे नेले.

---Advertisement---

या ठिकाणी किरण याने त्याच्या घरी सलग दोन दिवस तरुणीवर बळजबरीने अत्याचार केले. त्यानंतर तरुणीला एकटीला औरंगाबाद शहरातील सिडको येथील बस स्टँडवर सोडून किरण निघून गेला. भेदरलेल्या अवस्थेत तरुणी तिच्या गावी पोहचली व त्यानंतर तिने या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. या तक्रारीवरून गुरुवारी किरण कोलते याच्यासह त्याच्या तीन मित्रांविरुद्ध मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण हे करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---