⁠ 
सोमवार, मे 6, 2024

रावेर-यावल तालुका ट्रक ओनर्स असोसिएशनचा 1 पासून चक्का जामचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२१ । सावदा येथे दी 29 रोजी दुपारी तालुका ट्रक ओनर्स असोसिएशनतर्फे मोर्चा काढण्यात आला. यात गेल्या अनेक दिवसा पासून सुरु असलेल्या ट्रक चालक, ट्रांसपोर्ट चालक विरुद्ध केळी व्यापारी यांचे वादाची झालर असून, गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेली गाडी भाडयामधून हमाली कापण्याची रीत असून ती बंद व्हावी अशी ट्रक चालक व मालक यांची मागणी आहे.  तर केळी व्यापारी मात्र सदर प्रथा पूर्वी पासून असून ती रीत आहे ती तशीच राहील मात्र काही ट्रक मालक व ट्रांसपोर्ट चालक यास आता नवीन फाटा फोड़त असल्याचे सांगितले याच बाबतीत काही दिवसा पूर्वी ट्रक चालक मालक व केळी व्यापारी यांचेत एक समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती मात्र यात मार्ग निघाला नाही.

याच प्राश्वभूमिवर  सदर ट्रक चालक मालक असोसिएशन तर्फे सावदा येथील ट्रांसपोर्ट भागात मोर्चा काढून दी 1 सेप्टेंबर पासून येथून भरल्या जाणाऱ्या केळी च्या गाड्या भरण्यात येणार नाही व चक्का जाम केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.

रावेर – यावल तालुका ट्रक ओनर्स असोसिएशन तर्फे दी 1 पासून चक्का जाम आंदोलन करणार. कोणीही गाडी भरल्यास त्यास 50 हजारांचा दंड केळी माल वाहतुकीवर होणार. परिणाम केळी उत्पादक शेतकरी देखील येणार संकटात, सध्या भाव चांगले पण ट्रक बंद राहिल्यास केळी परप्रांतात जाणार नाही व त्यांचे परिणाम भावावर होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, येथून दररोज किमान 200 ते 300 ट्रक माल दररोज परप्रांतात रवाना होता यानिर्णया मुळे मोठे अर्थचक्र देखील थांबणार आहे. मोर्चा नियोजित नसताना काढण्यात आला कोरोना काळात मोर्चास पोलिसांची परवानगी होती का? हे देखील प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.