⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | नोकरी संधी | 10वी+ITI पास आहात का? मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे 2422 जागांसाठी भरती

10वी+ITI पास आहात का? मध्य रेल्वेच्या भुसावळसह येथे 2422 जागांसाठी भरती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Central Railway Bharti 2023 : तुम्ही जर दहावी आणि आयटीआय पास असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या २४२२ जागांसाठी बंपर भरती निघाली आहे.

यासाठीची अधिसूचना जारी झालेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 15 डिसेंबर पासून सुरु झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.

एकूण रिक्त पदे : २४२२

एकूण पदे : २४२२

रिक्त पदाचे नाव : अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) / Apprentice
रिक्त पदांचा तपशील
मुंबई – 1659
भुसावळ- 418
पुणे – 152
नागपूर -14
सोलापूर – 79

शैक्षणिक पात्रता : 10वी + ITI उत्तीर्ण

वयाची अट : १५ डिसेंबर २०२२ रोजी १५ वर्षे ते २४ वर्षापर्यंत. [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज शुल्क : १००/- रुपये.

पगार(Pay Scale) : 8000 /-रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2023
अधिकृत संकेतस्थळ :  www.cr.indianrailways.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.