⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | गॅस सिलिंडर भरण्याचे टेन्शन संपेल! आता फुकटात अन्न शिजवा, सरकारने आणली ‘ही’ पद्धत…

गॅस सिलिंडर भरण्याचे टेन्शन संपेल! आता फुकटात अन्न शिजवा, सरकारने आणली ‘ही’ पद्धत…

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२३ । मागील गेल्या काही महिन्यात गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांचे किचन बजेट कोलमडून गेलं आहे. गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यानंतर आता लोक स्वयंपाकासाठी वेगवेगळे पर्याय शोधू लागले आहेत. दरम्यान, सरकारने जेवण बनवण्याची एक नवीन पद्धत आणली आहे, ज्याद्वारे तुम्ही स्वस्तात अन्न शिजवू शकता. होय.. ती पद्धत नेमकी काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत.

काय आहे सरकारने नवीन पद्धत?

केंद्र सरकारने एक नवीन सोलर स्टोव्ह आणला आहे, ज्याद्वारे तुम्ही एलपीजी सिलिंडरशिवाय स्वयंपाक करू शकता. हा सोलर स्टोव्ह सूर्यप्रकाशात काम करतो. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

IOCL ने नवीन सुविधा सुरू केली
देशातील सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइल लिमिटेडने एक खास उपकरण लॉन्च केले आहे, ज्याद्वारे तुम्ही गॅसशिवाय स्वयंपाक करू शकता. इंडियन ऑइल (IOCL) ने सूर्या नूतन हा सौर स्टोव्ह लॉन्च केला आहे. फरिदाबाद येथील इंडियन ऑइलच्या संशोधन आणि विकास केंद्राने हा सोलर स्टोव्ह बनवला आहे.

देशातील अनेक शहरात गॅस सिलिंडरची किंमत 1100 रुपयावर
यावेळी गॅस सिलिंडरच्या किमती 1100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. जळगावमध्ये गॅस सिलिंडरची किंमत 1103 रुपये आहे. दुसरीकडे, जर तुम्ही सूर्य नूतनचा स्टोव्ह वापरला तर तुम्हाला गॅस सिलिंडरसाठी पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावात

स्टोव्हची किंमत किती?
जर आपण सोलर स्टोव्हच्या किंमतीबद्दल बोललो तर ते 12,000 रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 23,000 रुपये आहे. हा स्टोव्ह खरेदी करण्यासाठी तुम्हाला एकदाच पैसे खर्च करावे लागतील, परंतु त्यानंतर तुमचे पैसे वाचू शकतात कारण तुम्हाला एलपीजी गॅस सिलेंडर भरावा लागेल.

अधिकृत लिंक तपासा
या सोलर स्टोव्हबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही https://iocl.com/pages/SuryaNutan या अधिकृत लिंकला भेट देऊ शकता.

केबलद्वारे वापरले जाऊ शकते
हा सोलर स्टोव्ह तुम्हाला स्वयंपाकघरात ठेवावा लागेल, ज्यावर एक केबल जोडलेली आहे आणि ही केबल छतावर असलेल्या सोलर प्लेटला जोडलेली आहे. सौर प्लेटमधून निर्माण होणारी ऊर्जा केबलच्या माध्यमातून स्टोव्हपर्यंत पोहोचते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.