आदिवासी बांधवाना सवय लावत केंद्राने गॅसचे दर वाढवले : ना.जयंत पाटील
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । मोदी सरकारने आदिवासी बांधवांना गॅस सिलेंडर वापरण्याची सवय लावली. वनातील लाकडाचा वापर कमी होईल, प्रचार करताना ४०० मिळणारे सिलेंडर आज मोदी सरकारच्या काळात हजार रुपयाला एक गेले. आदिवासी बांधवांना गॅस स्वस्त मिळावा याची काळजी सरकारने घ्यावी. अशी मागणी महाविकास आघाडीचे मंत्री जयंत पाटील यांनी केली. यावेळी ते जळगाव शहरातील जि.एस ग्राउंडवर बोलत होते.
शिवतीर्थ मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या लोकसंघर्ष मोर्च्याच्या कार्यक्रमाला पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, आज पेट्रोल, डिझेलचे दर वाढले. महागाईची मोठी झळ सर्वांना भेटते आहे. देशात जातीय दंगली, ईडी, हनुमान चालीसाची चर्चा जास्त होते. नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून दुसरीकडे लक्ष वळविण्यात येत आहे. नवे प्रश्न निर्माण करून भावनिक आवाहन करण्यात येते.
महाराष्ट्रात आमचे सरकार तुम्हाला दिलासा देण्याचे काम करणार आहे. जलसंपदा विभागाशी संबंधित लहानमोठे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. जमन्या-गाडऱ्या येथील लहान धरणाचे काम देखील लक्षात आणून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वात सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी सांगितले.