जळगाव शहर
समस्त बारी पंच मंडळातर्फे संत रूपलाल महाराज पुण्यतिथी साजरी
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । येथील जोशीपेठेतील समस्त बारी पंच मंडळातर्फे श्री संत रूपलाल महाराज यांची पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी भिका बारी यांच्या हस्ते प्रतिमापूजन व आरती करण्यात आली.
या निमित्ताने श्री संत रूपलाल महाराज यांनी केलेल्या कार्याची माहिती समाज बांधवांना देण्यात आली. या वेळी पंच मंडळाचे पदाधिकारी विजय बारी, अरुण बारी, लतीश बारी, सुनील बारी, बालमुकुंद बारी, महेंद्र बारी, नितीन बारी, मयूर बारी, हर्षल बारी, विनोद लावणे, विजय बारी, राजू बारी, राहुल बारी, किशोर बारी, अनिल बारी, महिला अध्यक्षा इंदू बारी, सीमा कोल्हे, लीलाबाई बारी, जयश्री बारी, पूनम बारी, पूजा बारी उपस्थित होते.