जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२१ । दि.०१ जून रोजी एसटी चा ७४ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. प्रसंगी आगार व्यवस्थापक निलीमा बागुल यांनी बसेसची पुजा केली व केक कापून आजचा दिवस साजरा करण्यात आला. तसेच मालवाहतूक सेवा देखील महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली असुन सेवेचे महाकार्गो असे नामकरण करण्यात आले आहे. तसेच १ जुन पासुन प्रवासी वाहतूक १०% सुरू करण्यात आली असुन पाचोरा हुन चाळीसगाव, जळगाव, नंदुरबार, कल्याण, या बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
सदर कार्यक्रम साठी आगार प्रमुख निलीमा बागुल, सागर फिरके, जागृती पाटील, शितल मॅडम, निता जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, गणेश पाटील, रविंद्र पाटील आदींनी परीश्रम घेतले.
प्रवासी जनतेने अधिक माहितीसाठी ०२५९६,२४३०६१ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे