⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

माजी आमदार स्व.आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मे २०२२ । राणीचे बाँबरुड येथील रहिवाशी व माजी आमदार आप्पासाहेब ओंकार वाघ वखान्देशचा ढाण्या वाघ म्हणून  संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले पाचोरा तालुक्याचे सहकार,  आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी माजी आमदार स्व. आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांची  शुक्रवार दि. १३ मे रोजी ९०वी जयंती साजरी करण्यात आली.   स्व. आप्पांच्या शक्तीस्थळाला माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ ,पीटीसी चेअरमन नानासो संजय वाघ,कृउबा माजी सभापती दगाजी वाघ पुष्पार्पण व अभिवादन केले. 

सहकार आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. आप्पासाहेब समाजकारण ,सहकार, शिक्षण  केंद्रबिंदू मानून पाचोरा मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू केले. मतदारसंघात विविध प्रकल्प आणून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अनेकविध आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत.

खलील देशमुख व विनायक जकातदार यांनी स्व.आप्पासाहेबाच्या आठवणीना उजेळा दिला यावेळी मधुकर ओंकार वाघ, पी.टी.सी.चे व्हा. चेअरमन व्ही.टी. जोशी,खलील  देशमुख, पं स गटनेते ललित वाघ, नगरसेवक भुषण वाघ,वासुदेव महाजन,अशोक मोरे, आकाश वाघ,विजय पाटील,सरपंच बुऱ्हान तडवी,उपसरपंच शशिकांत वाघ  ,भोला चौधरी, ,अजय अहिरे,  प्रदीप वाघ,पितांबर कोतवाल,प्रेमराज शेवगे,सुभाष शिंदे,अली पेंटर,गुलाब तडवी,अली मेवाती, जगदीश वाघ,पिंटू दारकोंडे ,भाऊसाहेब पाटील ,सदाशिव नरवाडे नामदेव पाटील,, सुभाष शिंदे, सुभाष शिर्के,  राजेंद्र सोनार, रवींद्र पाटील,  राजु गावंडे ,गोदाराम बडगुजर,  भगवान डांबरे,प्राचार्य   

      वासुदेव वले, व्ही एन गायकवाड  ,मुख्याध्यापक सुधीर पाटील ,प्राचार्य डी व्ही पाटील, पर्यवेक्षक जी एन पाटील तसेच पाचोरा तालुका सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सरपंच उपसरपंच सदस्य विकास सभासद उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले.