जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑक्टोबर २०२१ । जळगाव येथील ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिवस हा मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवसाच्या निमित्ताने साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक डी.व्ही.चौधरी यांच्या हस्ते डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर चैतन्या सोनवणे, कनिष्का चौधरी, महीमा मोरे, सुजल चौधरी, पद्मिनी जाधव या विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या जीवनावर आधारित प्रसंग कथन केले. तर कृष्णगिरी गोसावी, जास्वंदी कुलकर्णी, यश सोनवणे, कल्याणी पाटील, चंचल चौधरी, संजना बारी, उत्कर्षा देशमुख या विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत इतिहास या पाठ्यपुस्तकातील पाठाचे अभिवाचन केले. कार्यक्रमाचे आयोजन भाषा विषय समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सी.बी. कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रतिभा लोहार, अतुल पाटील, डी.ए. पाटील, व्ही.एस. गडदे, सतिश भोळे, चंदन खरे, अनिल शिवदे यांनी परिश्रम घेतले.