---Advertisement---
रावेर

सावद्यात विश्व ब्राम्हणदिन उत्साहात साजरा

savda2
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ जून २०२१ । सावद येथील श्री. ब्राह्मण हितवर्धीनी समिती तर्फे विश्व ब्राह्मण दिन साजरा करण्यात आला.आर्य चाणक्य यांच्या जन्मदिना निमित्त नुकताच हा विश्व ब्राह्मण दिन कोरोना सारख्या वैश्विक महामारीचे सावट असल्यामुळे अगदी साध्या पद्धतीने घरगुती वातावरणात जोशीवाड्यात साजरा करण्यात आला.

savda2

कार्यक्रमाचे सत्कारमुर्ती वेद शास्त्र संपन्न सतिश महाराज व वेद मुर्ती रविंद्र जोशी( फैजपूर) यांचे  शुभ हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले. भगवान परशुरामाच्या प्रतीमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कु.राधिका जोशी हिने शांतीपाठाचे स्तवन केले.भगवान परशुराम व ब्राह्मणाची सामुहिक आरती करण्यात आली. रविंद्र जोशी यांनी समाजासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेत.

---Advertisement---

प्रत्येकाने आपले वैचारीक मतभेद बाजूला सारुन समाजकार्य करावे. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबा जोशी यांनी आपल्या मनोगतात ब्राह्मणांनी धर्माचे पालन करून धर्म वृद्धींगत होण्यासाठी आपण अथक परिश्रम घ्यावे. समाजाला सुसंस्कृत, सुसंस्करीत व संघटित करणे ही काळाची गरज आहे व त्या साठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन माधवी कानडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकांत मटकरी, दत्तात्रय कानडे, सुभाष कुलकर्णी, अनिल कासवेकर, रसीका जोशी, सानिका मटकरी यांनी परिश्रम  घेतले.कार्यक्रमास कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---