⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | इकरा थीम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिवस साजरा

इकरा थीम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक दिवस साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२१ । जळगाव येथील इकरा एच. जे. थीम महाविद्यालय जळगाव येथे शारीरिक शिक्षण व राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे “आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक  दिवस” साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून हॉकी प्रशिक्षक डॉ.चांद खान हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्ययालयाचे प्राचार्य डॉ. सैय्यद सुजाअत अली हे होते.

कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉ. अमीन काजी यांनी केली, तसेच डॉ.राजू गवरे, कार्यक्रम अधिकारी, रा. से. यो. यांनी प्रस्तावना केली. डॉ. इरफान शेख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्या नंतर डॉ.चांद्खान यांनी ऑलम्पिक दिवसा विषयी सखोल माहिती दिली. सोबतच विविध स्पर्धा मध्ये भारतीये खेळाडू यांनी केलेल्या  कामगिरीचा उल्लेख केला.

या कार्यक्रमा मध्ये ऑनलाईन सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विध्यार्थी, माजी विद्यार्थी (अलुम्नी असोशीएशन) यांनी भरपूर असा प्रतिसाद दिला. महाविद्यालयाचे माजी विध्यार्थी , विद्यापीठस्तरीय हॉकी खेळाडू  प्रा.आसिफ खान यांनी आपले मत व्यक्त केले.

या वेळी उप-प्राचार्य प्रा. आय. एम. पिंजारी, उप-प्राचार्य प्रा. डॉ. युसुफ पटेल, डॉ.वकार शेख, डॉ.हाफिज शेख, डॉ. मुस्तकीम, डॉ. डापके, प्रा. साजीत मलक, डॉ. तन्वीर खान, डॉ. अख्तर शहा, डॉ. फिरदौसी,  प्रा. फरहान शेख, डॉ. अंजली कुलकर्णी, प्रा. देवकर, डॉ.फिरदौस शेख, प्रा. शबाना खाटिक, प्रा. कहेकशा, प्रा. अम्बरीन इत्यादी उपस्थित होते. तसेच विध्यार्थी विध्यार्थिनी यांनी दृक्श्राव्य माध्यमातून सुद्धा सहभाग घेतला. माजी विद्यार्थी मिर्झा आसिफ इक़्बाल यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.