⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | नोकरी संधी | CBSE Bharti : पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी ; त्वरित अर्ज करावा

CBSE Bharti : पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी ; त्वरित अर्ज करावा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात विविध पदांसाठी जम्बो भरती निघाली आहे. विशेष या भरतीला सुरूवात झालीये. ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे. CBSE Bharti 2024

वयाची अट: 11 एप्रिल 2024 रोजी 18 ते 35 वर्षे. नियमानुसार वयात सूट मिळेल
अर्ज फी
सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना परीक्षा शुल्क म्हणून 1500 रुपये आणि गट B, C साठी 800 रुपये द्यावे लागतील. प्रत्येक पदासाठी उमेदवारांना स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. SC, ST, PWD, माजी सैनिक, महिला आणि नियमित CBSE कर्मचाऱ्यांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट सेक्रेटरी (Administration) 18
शैक्षणीक पात्रता :
 पदवीधर
2) असिस्टंट सेक्रेटरी (Academics) 16
शैक्षणीक पात्रता :
 संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
3) असिस्टंट सेक्रेटरी (Skill Education) 08
शैक्षणीक पात्रता :
 कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
4) असिस्टंट सेक्रेटरी (Training) 22
शैक्षणीक पात्रता 
: संबंधित पदव्युत्तर पदवी (ii) B. Ed. (iii) NET/SLET
5) अकाउंट्स ऑफिसर 03
शैक्षणीक पात्रता : 
पदवी (Economics/Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा पदवीधर + SAS/JAO किंवा पदव्युत्तर पदवी (Economics/ Commerce / Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) किंवा M.B.A.(Finance)/Chartered Accountant/ICWA.
6) ज्युनियर इंजिनिअर 17
शैक्षणीक पात्रता : 
B.E./B.Tech. (Civil)
7) ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर 07
शैक्षणीक पात्रता : (
i) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (ii) हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव.
8) अकाउंटेंट 07
शैक्षणीक पात्रता : 
(i) पदवी (Economics/ Commerce/ Accounts/ Finance/ Business Studies/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि
9) ज्युनियर अकाउंटेंट 20
शैक्षणीक पात्रता :
 (i) 12वी उत्तीर्ण (Accountancy/Business Studies/ Economics/ Commerce/ Entrepreneurship/ Finance/ Business Administration/ Taxation/ Cost Accounting) (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.