---Advertisement---
आरोग्य जळगाव जिल्हा महाराष्ट्र

सावधान : यंदा उन्हाळा असणार एकदम कडक!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मार्च २०२३ । भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील ‘अल निनो’ या समुद्र प्रवणतेच्या सक्रियतेमुळे यंदाचा उन्हाळा कडक असणार आहे. यामुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याच बरोबर मान्सूनच्या पर्जन्यावरही परिणाम होणार आहे.(harsh summer in jalgaon)

summer jpg webp webp

या बाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी शुक्रवारी बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी उन्हाळा अतिकडक राहील, अवकाळी पाऊस केव्हाही येऊ शकतो, पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करा, जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आरक्षित करा, सर्वच रुग्णांलयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

---Advertisement---

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पाणीटंचाई, ‘अल निनो’चा प्रभावावर उपाययोजनांची बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मित्तल म्हणाले, की जळगाव जिल्हा उष्माघात प्रवण आहे. त्या अनुषंगाने १ मार्च ते १५ जूनदरम्यान आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सर्व कार्यकारी यंत्रणांमध्ये समन्वय राहावा. उन्हाळ्यातील उष्मलाटेमुळे उद्भवणाऱ्या उष्माघातांनी मानव, पशु-प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर विविध विभागांनी कार्यवाही करावी.

१३ व १४ फेब्रुवारीला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी कार्यशाळा घेऊन उष्माघात उपाययोजनासाठी स्थानिक स्तरावर करावयाच्या नियोजनाविषयी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---