शेतकऱ्यांनो सावधान : शेतात कचरा पेटवू नका…. अन्यथा
जळगाव लाईव्ह न्यूज ।२२ मे २०२२ । शेकऱ्यांसाठी खूप महत्वाची ,माहिती समोर आली आहे. ती म्हणजे जर यांनी हंगामासाठी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून शेतातील काडी, कचरा पेटवला जाताे. यामुळे काही ठिकाणी आग लागण्याच्या प्रयात्न केला तर शेताची सुपीकता कमी होत आहे. परिणामी पर्यावरणासह मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होत असल्याने कचरा पेटवण्याऐवजी त्यावर फवारणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कचरा पेटवल्यामुळे वातावरणात कार्बन मोनोऑक्साइड (सीओ), मिथेन (सीएच-४), कार्सिनोजेनिक पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन्स, वाष्पशील सेंद्रिय संयुगे (व्हीओसी) सारखे हानिकारक वायू असलेले विषारी प्रदूषक उत्सर्जित होतात. हे प्रदूषित कण श्वासामधून मानवाच्या छाती, फुप्फुसात जाऊन दीर्घकाळ चालणारे श्वासाचे रोग निर्माण करतात. नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. तसेच मातीची सुपीकता कमी होत आहे.
शेतातील कचरा न पेटवता कृषी केंद्रातून वेस्ट डिकंपोजर खरेदी करुन त्यापासून शंभर लिटर पाणी तयार करून त्याची कचरा व पूर्ण फवारणी करावी. नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंगच्या संकेतस्थळावर माहिती मिळू शकते. वेस्ट डिकंपोजरमधील जिवाणू हे काडी कचऱ्याचे पूर्णतः विघटन करून मातीसाठी उपयुक्त बनवतात असे कृषी विभागाने अावाहन केले अाहे.
वाकेद परिसरात कचरा जाळून शेती तयार करताना.