---Advertisement---
भडगाव

आ.किशोर पाटलांवर गुन्हा दाखल करावा ; अमोल शिंदे यांचे पोलिसांना निवेदन

bhadgaon
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । भडगाव येथे दि. 6 जून सोमवार रोजी आमदारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून भडगाव येथील महावितरण कार्यालयावर ताला-ठोको व हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाच्या आधी आमदारांनी  कार्यकर्त्यांना उत्साहित व संतप्त अशी चिथावणीखोर वक्तव्य केले. परिणामतः भडगाव येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांचेसह कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीत वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतला असा गंभीर आरोप यावेळी भाजपाचे अमोल शिंदे यांनी केला.  

bhadgaon

तसेच अशा पद्धतीने महावितरण कार्यालयात जबरी प्रवेश करून अभियंता व  वायरमन यांना बेकायदा मारहाण करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या समाजविघातक प्रकृतीचा शोध घेऊन आमदारांसह संशयितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व  मृत कर्मचारी गजानन राणे यांच्या कुटुंबाला शासनस्तरावरून तात्काळ 50 लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे अशी मागणी आम्ही शासन दरबारी लावून धरणार आहोत असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले.

---Advertisement---

तसेच मागील सात आठ दिवसापासून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महावितरण कंपनीच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करीत होते. आणि अल्पमतात निवडून आलेल्या आमदारांनी पक्षात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून चैतन्य निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करून महावितरण विरोधात पत्रकार परिषदा घेतल्या होत्या व बातम्या छापून आणल्या होत्या.

मागील आठवडाभरात आमदारांनी केलेले प्रक्षोभक वक्तव्य,चिथावणी देणारे विधाने त्यातही प्रामुख्याने आमदार म्हणाले होते की महावितरण अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही तसेच कार्यालयात खुर्चीवर देखील बसू देणार नाही व त्यांच्या आंदोलनामुळे समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन मिळाले आहे. आमदार यांच्या सहेतुक भडक वक्तव्यामुळे अपप्रवृत्तीच्या लोकांना स्फुरण चढले आणि त्यामुळे संबंधित संशयितांनी हे कृत्य केले. आणि ही दुर्दैवी घटना घडली गजानन राणे यांच्या दुर्दैवी मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता विद्यमान आमदार यांचेसह मारहाण करणाऱ्या संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन भाजपचे अमोल शिंदे, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, भुषण देवरे, संजय पाटील, दिपक माने आदी पदाधिरकार्यांनी भडगाव  पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---