जळगाव लाईव्ह न्यूज । १० डिसेंबर २०२५ । २० हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी निंभोरा पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत पोलिस हवालदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. सुरेश पवार असं लाचखोर हवालदाराने नाव असून या करवाईने लाचखोराच्या गोठ्यात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

यातील तक्रारदार यांनी शेतकरी यांच्याकडून एक लाख २७ हजार रुपये किमतीचा केळीचा माल घेऊन तो दिल्ली येथील व्यापारी यांना विकला होता; परंतु सदर मालाचे पैसे शेतकऱ्यांना दिले नाही म्हणून त्यांनी तक्रारदार यांचे विरुद्ध तक्रार यांनी निंभोरा पोलीस स्टेशनला अर्ज केला होता.

त्याप्रमाणे निंभोरा पोलीस स्टेशनला कार्यरत पोलीस हवालदार सुरेश पवार याने तक्रारदार यांना तक्रार अर्जाची चौकशी कामे निंभोरा पोलीस स्टेशन येथे बोलवले होते परंतु सुरेश पवार हे तक्रारदार यांच्याकडे तक्रार अर्जात नमूद केलेल्या रकमेच्या दहा टक्के प्रमाणे लाच रक्कम मागितली. तक्रारदारांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ७ ऑक्टोबर रोजी कळवली. त्यानुसार पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता, पवार यांनी निंभोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्यासाठी २०,००० रुपये देण्याची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.या निकषांवरून हवालदार सुरेश पवार यांच्या विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकुर हे करीत आहेत.
यांनी केली कारवाई
कारवाई पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी केले. सापळा पथक स. फौज. दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ/ किशोर महाजन, मपोहेकॉ / संगीता पवार, पोकॉ/ राकेश दुसाने, पोकों/अमोल सुर्यवंशी, पोकों/भुषण पाटील सर्व नेम.ला.प्र.वि.जळगाव








