सावदा पोलीस ठाण्यात एकनाथ खडसेंविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

फेब्रुवारी 12, 2026 11:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)चे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यासोबत अरेरावी व एका बड्या मंत्र्यांबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप असून शासकीय कामात अडथळा आणि अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी खडसेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे स्वतः पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.

eknath khadse 1 jpg webp

मात्र एकनाथ खडसेंनी आरोपाचे खंडन करत गौण खनिज प्रकरणात गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? याबाबत माहिती घेण्यासाठी सावदा पोलीस स्टेशनला गेलो होतो व त्यावेळी पोलीस निरीक्षकांबाबत चुकीने एक शब्द निघाल्याने त्यांची माफी ही आपण मागितल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला आहे.

Advertisements

नेमके प्रकरण काय?
एकनाथ खडसे बुधवारी सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. रावेर तालुक्यातील तासखेडा येथील गौण खनिज चोरीच्या प्रकरणात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा जाब त्यांनी पोलिसांना विचारला. यावेळी पोलीस निरीक्षकांशी त्यांचा शाब्दिक वाद झाल्याचे सांगितले जाते. संभाषणादरम्यान खडसे यांनी अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. तसेच “अँटी करप्शनचा ट्रॅप लावतो,” असा इशाराही दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत सावदा पोलिसांनी आमदार खडसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements

एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी शासनाच्या मुरूम व गौण खनिज चोरीच्या प्रकरणांबाबत आपण प्रश्न उपस्थित केल्याचे सांगितले. “अडीच महिने चौकशी का होत नाही?” असा सवाल केला असता वाद झाला. संभाषणादरम्यान आपल्याकडून चुकीचा शब्द निघाल्याचे मान्य करत त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्याची माफी मागितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “चाळीस ते पन्नास हजार ब्रास गौण खनिज चोरीला गेल्याची तक्रार आहे. हप्ते घेतले जात असतील तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जावे लागेल,” असेही ते म्हणाले. तसेच सावदा परिसरातील नागरिकांनी अवैध व्यवसायांविषयी माहिती व छायाचित्रे द्यावीत, ती आपण माध्यमांसमोर मांडू, असे आवाहनही त्यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now