⁠ 
सोमवार, जुलै 22, 2024

आधी महिलेशी जवळीक साधली, नंतर परराज्यात नेलं, मग.. जळगावच्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । महिलांवर होणारे अत्याचाराचे काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे महिला आणि मुलींची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दरम्यान, अशातच जळगाव शहरामधील एका महिलेला बिहार राज्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आलीय. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय आहे घटना
औरंगाबाद जिल्ह्यातील २९ वर्षीय महिला ही जळगाव शहरातील एका भागात वास्तव्याला आहे. तिचे पतीसोबत कौटुंबिक वाद असल्याने ती औरंगाबाद येथून जळगाव शहरात रहायला आली होती. महिलेची राजेश कुमार जयनारायण पासवान (रा. संतौर, सहरसा नारायणपूर, बिहार) याच्याशी ओळख निर्माण झाली. राजेशकुमार याने महिलेशी जवळीक साधत तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबर दरम्यान बिहार राज्यात त्याच्या गावाला घेवून गेला. त्याठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. कुणालाही सांगून नको अशी धमकी दिली. महिला जळगावात आल्यानंतर बुधवारी ५ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून दुपारी २ वाजता संशयित आरोपी राजेशकुमार जयनारायण पासवान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे करीत आहे.