⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | चाळीसगावात खासदार आमदारांसह चार ते पाच हजार जणांवर गुन्हा

चाळीसगावात खासदार आमदारांसह चार ते पाच हजार जणांवर गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | चाळीसगाव | तुषार देशमुख | काल रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. मात्र शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार,आमदार यांच्यासह चार ते पाच हजार जमावावर चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल पुतळा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नितीन पाटील, संजय पाटील, चंद्रकांत तायडे, शहाबुद्दीन शेख, कैलास पाटील, व इतर चार ते पाच हजार अज्ञात जमावांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात कलम 188 प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब)व मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1), (3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक के के पाटील यांच्या निर्देशानुसार सुरू आहे.

हेही वाचा :

author avatar
Tushar Bhambare