⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | धक्कादायक! ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी जळगावात ९ जणांविरुद्ध गुन्हा

धक्कादायक! ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी जळगावात ९ जणांविरुद्ध गुन्हा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 21 जानेवारी 2024 । सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाइल्ड पॉर्न व्हिडिओ किंवा त्यासंबंधित कोणता व्हिडिओ, फोटो कुणाला पाठवला तर, संबंधितास तुरुंगात जावे लागू शकते. चाइल्ड पॉर्न बनवणे, पाहणे, फॉरवर्ड करणे आणि त्याला प्रोत्साहन देणे भारतात कायद्याने गुन्हा असूनही वारंवार अशा घटना घडत आहेत. बालकांचे लैंगिक शोषण ही फार गंभीर बाब असून लहान मुलांच्या अश्लील चित्रफिती तयार करणे, इंटरनेटवर अपलोड करणे किंवा सोशल मीडियावर व्हायरल करणे हा गुन्हा आहे.

असे असतानाही सोशल मीडियावर चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला चाइल्ड पोर्नोग्राफीला बंदी असताना यू-ट्यूब व इन्स्टाग्राम आयडी असणाऱ्या खातेधारकांनी त्यांच्या या खात्याद्वारे चाइल्ड पोर्नोग्राफीचे व्हिडीओ प्रसारित केले. हा प्रकार १५ जानेवारी २०२१ ते १० मे २०२१ दरम्यान घडला. ही बाब लक्षात आल्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल दीपक सोनवणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या नऊजणांविरुद्ध शुक्रवारी १९ जानेवारी २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.