१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ऑगस्ट 10, 2023 3:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। भडगाव तालुक्यातील एका गावात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने विवाह लावल्या प्रकरणी ७ जणांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Untitled design 27 jpg webp webp

सूत्रांनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा विवाह समाधान संतोष सोनवणे याच्याशी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी लावण्यात आला होता. मात्र मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून सुद्धा तिच्याशी लग्न करण्यास भाग पाडले.

Advertisements

याप्रकरणी आरोपी नितीन यशवंत वाघ ,दिपाली नितीन वाघ, दोघे रा. ता. पाचोरा, संतोष गेंदा सोनावणे, निर्मला संतोष सोनवणे, समाधान संतोष सोनवणे, प्रीतम संतोष सोनवणे ,पूजा प्रीतम सोनवणे ,सर्व रा.ता. भडगाव यांच्याविरुद्ध फिर्यादी अल्पवयीन मुलगी हिच्या फिर्यादीवरून ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९, ११ प्रमाणे भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहे.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now