Car Loan : तुमचा कार विकत घ्यायच स्वप्न लवकरच होणार पूर्ण, या बँकांचे व्याजदर सर्वात कमी
जळगाव लाईव्ह न्यूज ।Car Loan ।जून महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. अश्यावेळी रेपो रेट वाढून तो 4.9 टक्क्यांवर पोहचला आहे.पर्यायी गृहकर्ज आणि वाहन कर्जावर व्याजदर वाढले आहेत. मात्र देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहक फार मोठा आहे. हि तब्बल ९० टक्के कर्ज मंजुर करते. नवीन कार खरेदी करण्यासाठी बँक 7 वर्षांच्या मुदतीवर कर्ज मंजूर करत आहे. . एसबीआय कार लोन, एनआरआय कार लोन आणि एस्योर्ड कार लोन योजनेसाठी 7.65 ते 8.35 टक्के दरम्यान व्याजदर निश्चित करण्यात आाला आहे. जो एक प्रकारे एकदम कमी आहे.
तर दुसरीकडे पंजाब नॅशनल बँकेचे ऑटो लोन हे रेपो लिंक्ड लेंडिंग रेट सोबत जोडलेले आहे. पंजाब नॅशनल बँकेने सध्यस्थितीतील 6 जून 2022 रोजी पासून आणि नवीन ग्राहकांसाठी व्याजदरात वाढ केली आहे. व्याजदर 6.90 टक्क्यांहून वाढवून ते 7.40 टक्के करण्यात आले आहे. मात्र हेही एकदमी कमी आहे.
आता त्यांना पहिल्यापेक्षा अधिक ईएमआय म्हणजे हप्ता चुकवावा लागणार आहे. रेपो रेटमध्ये वाढ होताच, बँकांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली. त्यामुळे व्याजदर पहिल्यापेक्षा अधिक वाढले. कर्ज घेताना व्याजदर एकतर एकाच दराने स्थिर ठेवता येतात किंवा बदलत्या धोरणानुसार बदलते व्याजदराचा पर्याय निवडता येतो. निश्चित व्याजदर हा एकाच दराने शेवटपर्यंत कायम राहतो. त्यावर व्याजदर कमी झाले अथवा वाढले त्याचा परिणाम होत नाही. तर फ्लोटिंग रेट हे कमी जास्त होत राहतात. त्यामुळे कारचे स्वप्न साकारण्यासाठी या तीन बँकांच्या कर्ज व्याजदरावर तुम्हाला लक्ष द्यावे लागेल.