⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

कारचा भीषण अपघात; जामठीचा इसम ठार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । जामठी येथील रहिवासी असलेल्या इसमाचा मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथे शनिवारी झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला. राजेंद्रसिंग रणजितसिंग राजपूत उर्फ ठाकूर (वय ४५) असे मृताचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, शनिवारी बडवानी येथे राजेंद्रसिंग ठाकूर हे मेहुणीच्या लग्नासाठी गेले हाेते. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी कामानिमित्त बाहेर पडले असताना आग्रा-मुंबई महामार्गावर त्यांच्या कारला जबर अपघात होऊन तीनवेळा पलटी हाेऊन कार सुमारे ४० फूट दूर खाली फेकली गेली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे. दोन जणांपैकी एक राजेंद्रसिंग ठाकूर हे येथील रहिवासी असून दुसरा विक्रमसिंग यांचाही अपघातात जागीच मृत्यू झाला. तर तिसरा त्यांचा चुलत मेहुणा गंभीर जखमी असल्याचे समजते. या घटनेबाबत येथे समजताच गावामध्ये शोककळा पसरली. राजेंद्रसिंग ठाकूर यांच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, बहीण, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे. राजेंद्रसिंग ठाकूर यांच्या मृतदेह जामठी येथे आणल्यानंतर रविवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.