⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | 12वी पास आहात का? केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महाभरती सुरु, भरघोष पगार मिळेल

12वी पास आहात का? केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महाभरती सुरु, भरघोष पगार मिळेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) मार्फत विविध पदांसाठी जम्बो भरती जाहीर केलीय. विशेष बारावी पास उमेदवारांना थेट केंद्रीय नोकरी मिळविण्याची संधी आहे. पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा. CAPF Recruitment 2024

या भरतीद्वारे एकूण 1526 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि हो लक्ष्यात असू द्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 पर्यंत आहे. CAPF Bharti 2024

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट) -243
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
2) हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) -1283
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज फी :
उमेदवारांना 100 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि आरक्षणासाठी पात्र माजी सैनिकांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे. सूट मिळालेल्या उमेदवारांसह सर्व उमेदवारांना लागू सेवा शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना भरती परीक्षेच्या तीन टप्प्यांतून जावे लागेल. शारीरिक चाचणी, संगणक-आधारित चाचणी (CBT), कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी (DME/RME).

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.