Jalgaon : निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुकांची महापालिकेत मोठी गर्दी

डिसेंबर 25, 2025 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असल्याने निवडणुकीसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठी इच्छुक उमेदवारांची जळगाव महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत मोठी गर्दी होत आहे. विशेषतः महापालिकेची थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापराचा दाखला तसेच शासकीय ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उमेदवारांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे.

mnp

दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी ६१८ जणांनी नामनिर्देशन अर्ज विकत घेतले, मात्र एकही अर्ज दाखल झाला नाही. पहिल्या दिवशी ७७७ अर्जाची विक्री झाली होती. दोन्ही दिवस मिळून १३९५ अर्ज विक्री झाले आहेत.

Advertisements

दुसरीकडे निवडणुकीसाठी महत्त्वाचे असलेले ‘कर थकबाकी नसल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी बुधवारी पाचव्या मजल्यावरील मिळकत वसुली विभागात प्रचंड गोंधळ होता. इच्छुक उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवाराकडे महापालिकेची कोणतीही थकबाकी नसल्याचा दाखला असणे बंधनकारक आहे. यात मालमत्ता कर, पाणीपट्टी व अन्य शुल्कांचा समावेश होतो. याशिवाय उमेदवार शासकीय ठेकेदार नसावा तसेच स्वतःच्या निवासस्थानी शौचालयाचा वापर करत असल्याचा दाखला सादर करणेही आवश्यक आहे. या तिन्ही महत्त्वाच्या दाखल्यांसाठी सध्या संबंधित विभागांबाहेर इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

Advertisements

अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ येत असल्याने इच्छुकांची पावले महापालिकेकडे वळू लागली आहेत. पण तांत्रिक अडचणींमुळे दाखले मिळत नाहीत. दाखले वितरित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या खिडक्यांची संख्याही अपुरी पडत असून, महापालिकेने तातडीने अतिरिक्त कर्मचारी आणि खिडक्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काच वेळी शेकडो अर्ज आल्याने वसुली विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now