जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२६ । जळगाव शहर महानगरपालिका सार्वीत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा ‘नारळ’ फोडण्यात आला असून प्रभाग १६ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज मंगळवारी सकाळी आमदार राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात, घोषणाबाजी करत प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना मार्गदर्शन केले. भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रचाराप्रसंगी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. प्रभागातील भाजपचे अधिकृत उमेदवार प्रभाग १६ ‘ब’ – वंदना संतोष इंगळे, प्रभाग १६ ‘क’ – रंजना विजय वानखेडे, प्रभाग १६ ‘ड’ – सुनील वामनराव खडके यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग १६ ‘अ’ मधून बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक डॉ. विश्वनाथ खडके यांची उपस्थिती होती.

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आमदार आणि उमेदवारांनी विविध परिसरांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला. यामध्ये मनुदेवी मंदिर परिसर, अशोक नगर, शांतिनिकेतन सोसायटी, अजिंठा हौसिंग सोसायटी, सरदार वल्लभभाई पटेल नगर, रौनक कॉलनी, सदगुरू नगर, सिद्धिविनायक शाळा परिसर, अयोध्या नगर, हनुमान नगर, गणेश पार्क आणि कौतिक नगर या भागांचा समावेश होता.

ठिकठिकाणी प्रभागातील बंधू-भगिनींनी उमेदवारांचे जल्लोषात स्वागत करत औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नागरिकांचा हा उस्फूर्त प्रतिसाद आणि मिळणारे प्रेम पाहून भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, विजयाची खात्री असल्याचे मत उमेदवारांनी व्यक्त केले आहे. प्रभाग १६ मध्ये भाजप उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या प्रचार दौऱ्यात प्रभागातील प्रतिष्ठीत नागरिक, युवक आणि मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
या प्रचार रॅलीला भाजपचे पदाधिकारी मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, माजी नगरसेवक प्रदीप रोटे, सरचिटणीस किसान मराठे, प्रदेश कार्य सदस्य संतोष इंगळे, महानगर कोषाध्यक्ष विजय वानखेडे, मा मंडल अध्यक्ष सुनील सरोदे,मंडळ उपअध्यक्ष अनिल चौधरी, हितेश खडके, योगेश डोळे, चिटणीस पूजा सरोदे, सामाजिक कार्यकर्ते बाळा भाऊ सोनवणे, योगेश काळे, ललित चौधरी, विजय दीक्षित, एकनाथ भावसार, रुपेश सरोदे, अनिल पाटील, अनिकेत मराठे, चंदन महाजन, अजय नेमाडे, गलू काळे, ललित खडके, ज्ञानदेव नेमाडे, किशोर पाटील, मधुकर महाजन, निलेश खडके, गौरव खडके, विवेक चौधरी, हर्षल पाटील, सुदर्शन चलसे, ज्ञानेश्वर पाटील, हेमंत महाजन, कल्पना माळी, कुमुदनी चौधरी, जयंत इंगळे, वामन महाजन, नंदू पाटील, भूषण देवरे, प्रवीण वाणी, प्रवीण सोनार आदी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




