महाराष्ट्रराजकारण

चिंचवड पोटनिवडणुकीवरून जगताप कुटुंबातला वाद चव्हाट्यावर; रस्त्यावर सुरू झालय पोस्टर वॉर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२३ । चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहीर झाला आहे. आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. मात्र जगताप यांच्या घरातून कोणाला उमेदवारी दिली जाणार हे अद्याप ठरलेले नाही.

याबाबत भाजप लवकरच निर्णय घेऊ शकते. दरम्यान, उमेदवारीवरून जगताप कुटुंबात वाद सुरू असल्याचीही चर्चा आहे. या उमेदवारीवर लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी दावा केला आहे. अशा स्थितीत भाजपचा उमेदवार कोण असेल या चर्चांना उधान आले आहे.

दरम्यान, लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनीही उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ते म्हणाले की मी अर्जही दाखल केली आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने जी यादी प्रसिद्ध केली आहे त्यात शंकर जगताप यांचे नाव नाही.

चिंचवड पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर जगताप घराण्यातील एकाच उमेदवाराचे नाव निवडणुकीसाठी पुढे येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दोन जणांनी उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा व्यक्त केल्याने जगताप कुटुंबात तेढ निर्माण झाला आहे.

एवढेच नाही तर आता पोस्टर वॉरही पाहायला मिळत आहे कारण दोघांच्या समर्थकांनी पोस्टर लावले आहेत. अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्या समर्थकांनी चिंचवड पोटनिवडणुकीत आपापल्या नेत्याला उमेदवारी मिळावी, अशी पोस्टर्स लावली आहेत.

भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यामुळेच चिंचवड पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. यासोबतच महाविकास आघाडीनेही ही निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.

महाविकास आघाडीकडून या निवडणूकीसाठी राहूल कलाटे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. ते राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार आहेत. पण त्यांच्या नावालाही राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button