पाचोऱ्यातील व्यापाऱ्याची गुजरातच्या पाच जणांकडून लाखोंची फसवणूक ; गुन्हा दाखल

जानेवारी 3, 2026 12:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोरा येथील एका कापूस व्यापाऱ्याची गुजरातच्या पाच जणांनी संगनमत करून ७ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच संशयितांवर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2 jpg webp

फिर्यादी सुभाष पांडुरंग पाटील (वय ५५, रा. सार्वे प्रिप्री, ता. पाचोरा) यांचा शेतीसह कापूस खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी शाहिद बशीर मुसलमान (रा. घटनांद्रा, ता. सिल्लोड) आणि जितुभाई जेठालाल यांच्या मध्यस्थीने गुजरात येथील आदेश कॉटन जिनिंग (जलालपुरा रोड, ता. गठाला, जि. बोटाद, सौराष्ट्र) या फॅक्टरीला कापूस विक्रीचा व्यवहार केला होता. सुभाष पाटील यांनी २६ आणि २७ ऑगस्ट २०२५ दरम्यान एकूण तीन ट्रकमध्ये २९१ क्विंटल ७७ किलो कापूस पाठवला होता. या कापसाची एकूण किंमत २१,१२,५९० रुपये इतकी होती. त्यापैकी आरोपींनी १४ लाख ७ हजार ५९० रुपयांचे पेमेंट दिले.

Advertisements

मात्र उर्वरित ७ लाख ५ हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने आणि मध्यस्ती व जिनिंग मालकांनी संगनमत करून फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पाटील यांच्या फिर्यादीवरून ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानुसार संशयित आरोपी रमेशभाई (जिनिंग मालक), धवलभाई (जिनिंग मालक), कुलराजभाई, जितुभाई जेठालाल (मध्यस्थ), शाहिद बशीर मुसलमान (दलाल, रा. सिल्लोड) यांचा शोध सुरु आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील तपास करत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now