गुन्हेजळगाव जिल्हा

Breaking : सप्तशृंगी गड घाटात बसला भीषण अपघात, जळगावातील १५ प्रवाशांचा समावेश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२३ । नाशिकच्या सप्तश्रृंगीगड घाटात प्रवाशांसह बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २१ प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यापैकी जळगाव जिल्ह्यातील १५ प्रवाशांचा समावेश असून त्यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. आशाबाई राजेंद्र पाटील (वय -५०ते ५५ रा. मुडी, ता. अमळनेर) असं अपघातातील मृत महिलेचं नाव आहे.

नेमकी काय आहे घटना?

अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची आहे. काल सकाळी 8.30 वाजता ही बस सप्तशृंगी गडाच्या दिशेनं रवाना झाली होती. त्यानंतर बस सप्तशृंगी गडावर रात्री मुक्कामाला होती. त्यानंतर पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता.

याच दरम्यान, वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असलेल्या बसला मोठा अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. सध्या बसमध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी असल्याचे समजते आहे.

त्यात एकूण २१ जण जखमी झाले असून त्यात १५ प्रवाशी हे जळगाव जिल्ह्यातील होते. यात एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. मृत महिला आशाबाई राजेंद्र पाटील या अमळनेर तालुक्यातील मुडी येथील रहिवाशी आहे.

अपघातातील जळगाव जिल्ह्यातील जखमी
प्रमिला गुलाबराव बडगुजर (सुनील गुलाबराव बडगुजर, मुलगा) – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
रघुनाथ बळीराम पाटील – रा. भोकर, जि जळगाव
बाळू भावलाल पाटील – रा. भोकर, जि जळगाव
संजय बळीराम भाईर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
सुशीलबाई सोनू बडगुजर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
वच्छलाबाई साहेबराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
सुशीलबाई बबन नजान – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
विमलबाई भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
प्रतिभा संजय भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
जिजाबाई साहेबराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
संगीता मंगुलाल भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
रत्नाबाई (नाव सांगता आले नाही) – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
सुरेखाबाई हिरालाल बडगुजर – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
संगीत बाबुलाल भोई – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव
भारगोबाई माधवराव पाटील – रा. मुडी ता. अमळनेर, जि जळगाव

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button